Sports(खेलकूद)
मुलांचे शरीर बळकट व्हावे व राष्ट्रप्रेमी खेळाडू निर्माण व्हावे म्हणून तिरंदाजी कबड्डी खो-खो अशा देशी खेळांच्या स्पर्धा आपण घेत असतो. मुंबईत २० नवयुवकांबरोबर ७ ते ९ ऑगस्ट १९८७ मध्ये खेल केन्द्र सुरु झाले आणि १९९१ मध्ये मुंबईत ही पहिली वनवासी क्रीड़ा स्पर्धा आयोजित केली गेली, ज्यामध्ये Flying Sikh श्री मिल्खा सिंह सुद्धा सामील झाले होते. पहिल्या आयोजनात १५ राज्यांतून ३९२ खेळाडूंनी भाग घेतला होता. तेव्हापासून ते आजपर्यंत २३ राष्ट्रीय वनवासी खेल स्पर्धा झाल्या आहेत आणि आता ह्या वेळी २४वी स्पर्धा होत आहे. सगळ्या स्पर्धांमध्ये जनजातीय समाजाची ओळख म्हणवणारा धनुर्विद्या हा खेळ असतो आणि ह्याच बरोबर दुसरे कबड्डी, खोखो, फुटबॉल इ.खेळ पण घेतले जात आहेत
