Youth(युवा कार्य)
सर्वच क्षेत्रात तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे. कारण तरुणांमध्ये बदल घडवून आणण्याची अद्भुत शक्ती आहे. ही बाब लक्षात घेऊन आदिवासी तरुणांमध्ये आपल्या संस्कृती, परंपरेविषयी अभिमानाची भावना निर्माण करून समाजासाठी काहीतरी योगदान देण्याची मानसिकता निर्माण करण्याबरोबरच समर्पित व संवेदनशील युवा नेतृत्व निर्माण करण्याचे काम कल्याण आश्रमाची युवा शाखा करीत आहे. शहरात राहणाऱ्या तरुणांना आपल्या आदिवासी समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांना आदिवासी भागाचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचे काम विविध माध्यमातून केले जात आहे.
विविध विद्यालयांत जाऊन त्यांना आपल्या जनजाती क्रांतिकारकांविषयी माहिती देणे, आपल्या विविध पाड्यांवर युवकांना घेऊन जाऊन त्यांना आपल्या कार्याविषयी माहिती देणे इ. कामे कल्याण आश्रम अधिकाधिक तरुण तरुणांमध्ये कार्य वाढवणे यासाठी करत आहे.
